ठाणे Thane Murder News: विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा याचं लग्न 14 वर्षापूर्वी झालं होतं. त्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. तसंच तो पत्नीपासून विभक्त राहत होता. घटनेच्या दिवशी तो पत्नी जरीन हिला भेटण्यासाठी आला होता. परंतु त्याला घरात घेतल्यानं राग अनावर झालेल्या विजय उर्फ समीर याने हातोडीनं पत्नी जरीन हिच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केली. तर वाद सोडविण्यासाठी आलेल्या सासुवर हल्ला करून जखमी केल्याची घटना मुंब्रा येथील अंबेडकर नगर येथे घडलीय. मुंब्रा पोलिसांनी आरोपी विजय उर्फ समीर याला अटक केली. त्याच्या विरोधात खून आणि खूनीहल्ला प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
कौटुंबिक वाद : अटक आरोपी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा आणि जरीन अंसारी (30) यांचा 14 वर्षापूर्वी विवाह झाला होता. आरोपीनं मुस्लिम धर्म स्वीकारला होता. आरोपी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा हा भिवंडी काल्हेर येथील रहिवाशी आहे. विवाहानंतर दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य आहेत. कौटुंबिक वादातून आरोपी विजय उर्फ समीर याचे आणि पत्नी जरीन याचा कौटुंबिक वाद झाला. त्यामुळे दोघे विभक्त राहत होते.
सासूने दिला घरात घेण्यास नकार :आरोपी विजय उर्फ समीर हा काल्हेर भिवंडी आणि पत्नी जरीन ही आपल्या आईकडे मुंब्रा आंबेडकर नगर येथे आई, दोन मुले यांच्यासोबत राहत होती. दरम्यान गुरुवारी दुपारी आरोपी विजय उर्फ समीर हा पत्नीला भेटण्यासाठी मुंब्रा आंबेडकर नगर येथील घरात गेला. मात्र, घरातील मृतक जरीन हिच्या आईनं मात्र विजय उर्फ समीर याला घरात घेण्यास नकार दिला. यावरून वाद झाला. तर रागाच्या भरात आरोपी विजय हा बांधकाम साइटवर काम करीत होता.