ठाणे -शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आणला आहे. महापालिकेची मान्यता असलेल्या दोन लॅब्सने कोरोनाचे परस्पर विरोधी अहवाल दिल्याने ठाण्यातील एक कुटुंबीय चिंतेत पडले आहे. या कुटुंबातील महिलेने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लॅब्समध्ये कोरोनाची चाचणी केली. दोन्ही अहवाल पाहून त्यांना धक्काच बसला. एका लॅबने त्यांना पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या लॅबने त्यांना निगेटिव्ह अहवाल दिला. त्यामुळे दोन्ही लॅबच्या परस्परविरोधी अहवालामुळे संपूर्ण कुटुंबीय संभ्रमात पडले आहे.
ठाणे महापालिकेचा सावळा गोंधळ, एकाच महिलेचे दोन लॅबकडून वेगवेगळे अहवाल - ठाणे कोरोना अपडेट
एका कुटुंबातील महिलेने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या लॅब्समध्ये कोरोनाची चाचणी केली. दोन्ही अहवाल पाहून त्यांना धक्काच बसला. एका लॅबने त्यांना पॉझिटिव्ह, तर दुसऱ्या लॅबने त्यांना निगेटिव्ह अहवाल दिला. त्यामुळे दोन्ही लॅबच्या परस्परविरोधी अहवालामुळे संपूर्ण कुटुंबीय संभ्रमात पडले आहे.
![ठाणे महापालिकेचा सावळा गोंधळ, एकाच महिलेचे दोन लॅबकडून वेगवेगळे अहवाल thane corona upadate thane municipality news thane municipality covid lab ठाणे कोरोना अपडेट ठाणे महापालिका न्यूज ठाणे कोरोना अपडेट ठाणे महापालिका लॅब प्रकरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7967295-thumbnail-3x2-thane.jpg)
दोन्ही लॅबने वेगवेगळा अहवाल दिल्याचे समजताच ठाणे, पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना घेराव घातला. ठाणे शहराला कोरोनाचा विळखा घट्ट बसलेला असतानाच पालिकेच्या भोंगळ कारभाराने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महापौर नरेश म्हस्के आणि ठाण्यातील सर्व नेते गायब झाल्याने आज ठाणेकरांनी जाब कोणाला विचारायचा? असा थेट सवाल अविनाश जाधव यांनी केला. मनसेने पालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज थेट पालिकेत धडक देऊन सर्वांनाच धारेवर धरले. ठाणे महानगरपालिकेने लवकरच आपल्या कारभारात सुधारणा करावी आणि नागरिकांना यावेळी मदतीचा हात द्यावा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशारा जाधव यांनी दिला.