ठाणे -मीरा भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांना पालिका प्रशासनाने नोटिसा चिटकवल्या आहेत. संबंधित वाहनधारकांना 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा पालिका प्रशासन जप्तीची कारवाई करणार आहे.
बेवारस वाहनांना पालिकेच्या नोटिसा ; 48 तासांची मुदत, अन्यथा जप्ती
मीरा भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांना पालिका प्रशासनाने नोटिसा चिटकवल्या आहेत. संबंधित वाहनधारकांना 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा पालिका प्रशासन जप्तीची कारवाई करणार आहे.
शहरातील बेवारस वाहनांचे सर्वेक्षण पालिकेने सुरू केले आहे. मीरा भाईंदर शहरातील कोणत्याही अंतर्गत रस्त्यांवर बेवारस धूळखात पडलेली वाहने सापडल्यास पालिका कायद्याचा बडगा उचलणार आहे. अशा बेवारस वाहनांवर नोटीस चिटकवण्यात आली आहे. तसेच 48 तासांत वाहन काढून घ्या, अन्यथा पालिका ते उचलणार असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पालिकेमार्फत दरवर्षाी या प्रकारची नोटीस प्रसिद्ध करण्यात येते. पालिकेने जप्त केलेली वाहनं 8 दिवसात संबंधित मालकाने सोडवावे लागले. दुचाकी वाहनासाठी 1200 रु व चारचाकीसाठी 3000 हजार रुपये दंड भरावा लागतो. आठ दिवसांनंतर देखील वाहन न सोडवल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची नोंदणी रद्द करून त्याचा ई-लिलाव केला जातो.