ठाणे- ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एकूण ९ प्रभाग समितींपैकी शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँग्रेसला २ तर, भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला १ प्रभाग समिती अध्यक्षपद आले आहे. यावर्षी प्रभाग समिती अध्यक्षपदी महिलांचे राज्य दिसत असून ९ पैकी ७ प्रभाग समिती अध्यक्षपदी महिलांची निवड झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत 'महिलाराज' - ठाणे महापालिका
यावर्षी प्रभाग समिती अध्यक्षपदी महिलांचे राज्य दिसत असून ९ पैकी ७ प्रभाग समिती अध्यक्षपदी महिलांची निवड झाली आहे.
शिवसेनेतर्फे कोपरी प्रभाग समिती अध्यक्षपदी नम्रता पमनानी, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी प्रज्ञा भगत, दिवा प्रभाग समिती अध्यक्षपदी दिपाली भगत, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षपदी निर्मला कनसे, वागळे इस्टेट प्रभाग समिती अध्यक्षपदी शिल्पा वाघ तर वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षपदी नरेश सूरकर या शिवसेना सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. कळवा प्रभाग समिती अध्यक्षपदी जितेंद्र पाटील आणि मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदी आश्रीन राऊत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे तर उथळसर प्रभाग समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपा गावंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.