महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे पालिकेने दिल्या विकासकांना नोटिसा, नालेसफाई वेळेवर अन्यथा ठाण्यात पूर परिस्थिती - ठाणे पालिका न्यूज

ठाणे शहर जसे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे तसेच नाल्यांचे शहर म्हणूनही त्याची ख्याती आहे. शहरात जवळपास 150 किलोमीटरचे लहानमोठे नाले असून दरवर्षी अनेक नाले स्वच्छ न झाल्याने लोकवस्त्यांध्ये पाणी भरते. त्यामुळे पालिकेने नालेसफाई करण्यासाठी संबंधित विकासकांना नोटीसा दिल्या आहेत.

Thane Municipal Corporation
ठाणे पालिकेने दिल्या विकासकांना नोटिसा

By

Published : May 21, 2020, 9:50 PM IST

ठाणे -अवघ्या काही दिवसांवर पावसाळा आला आहे. अशा स्थितीत शहरातील नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे. ठाणे शहर जसे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे तसेच नाल्यांचे शहर म्हणूनही त्याची ख्याती आहे. शहरात जवळपास 150 किलोमीटरचे लहान-मोठे नाले असून दरवर्षी अनेक नाले स्वच्छ न झाल्याने लोकवस्त्यांध्ये पाणी भरते आणि अनेकांचे संसार पाण्याखाली जातात. त्यामुळे पालिकेने नालेसफाई करण्यासाठी संबंधित विकासकांना नोटीसा दिल्या आहेत.

ठाणे पालिकेने दिल्या विकासकांना नोटिसा

ठाण्यातील प्रमुख नाला उपवन येथून सुरु होऊन शहराच्या विविध भागातून वाहत खाडीला जाऊन मिळतो. सदरचा नाला शहरातील 30 ते 40 टक्के घाण पाणी वाहून नेण्याचे काम करतो. या नाल्याची वेळीच सफाई झाली नाही, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केला आहे. त्यांच्या प्रभागात रुस्तमजी बिल्डर यांनी या प्रचंड मोठ्या नाल्याला अनेक ठिकाणी वळविले आहे. बऱ्याच ठिकाणी त्याची रुंदी देखील कमी केली आहे. तर बऱ्याच ठिकाणी नाला बंद केल्याची तक्रार तरे यांनी पालिकेकडे केल्याचे सांगितले. नालेसफाई वेळेवर करण्यासाठी संबंधीत विकासकांना नोटिसा दिल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे पालिकेने दिल्या विकासकांना नोटिसा


दरवर्षी ठाण्यात काही ठराविक भागात पाणी साचते अनेक घरात सोसायटीमध्य यामुळे पाणा साचून नुकसान होते करोड़ो रूपये नालेसफाई वर खर्च होतात. पण ठेकेदार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हे या पाणी भरण्यासाठी कारणीभूत ठरते

ABOUT THE AUTHOR

...view details