ठाणे - राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून ठाणे कोव्हिड 19 योद्ध्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे शहरात 'कोव्हिड 19 योद्ध्यांं'ची फौज तैनात - Corona Warriors
ठाण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून कोव्हिड-19 योद्धा म्हणून काही तरुणांची नेमणूक केली आहे. हे तरुण ठाणे महापालिका हद्दीत टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांचे समुपदेश करणार आहेत. जे सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशांविरोधात पोलिसांतही तक्रार करणार आहेत.
कोव्हिड-19 योद्धे
Last Updated : May 8, 2020, 8:20 PM IST