ठाणे :ठाणे महानगरपालिकेची ( Thane Municipal Corporation ) मुदत संपून जवळपास नऊ महिने उलटले. तरी अद्याप निवडणूक झालेली नाही. पालिकेवर प्रशासन म्हणजेच विना लोकप्रतिनिधी पालिकेचा कारभार हा पालिका आयुक्तांच्या अधिपत्याखाली ( Under the Municipal Commissioner ) चालत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा ठाण्याच्या विकासावर होत असल्याचे चित्र आहे. केवळ राजकारणामुळे पालिकेच्या निवडणूका या निवडणूक आयोग नाही तर राजकारणांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर होणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याची, प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Thane Municipal Corporation Election: ठाणे महानगरपालिका निवडणुका लांबणीवर, तारीख पे तारीखमुळे विकास खोळंबला..
ठाणे महानगर पालिकेची ( Thane Municipal Corporation ) मुदत संपून जवळपास नऊ महिने उलटले. तरी अद्याप निवडणूक झालेली नाही. पालिकेवर प्रशासन म्हणजेच विना लोकप्रतिनिधी पालिकेचा कारभार हा पालिका आयुक्तांच्या अधिपत्याखाली ( Under the Municipal Commissioner ) चालत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा ठाण्याच्या विकासावर होत असल्याचे चित्र आहे. केवळ राजकारणामुळे पालिकेच्या निवडणूक या निवडणूक आयोग नाही तर राजकारणांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर होणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याची, प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
सत्ताबदलामुळे निवडणुका लांबणीवर - महाराष्ट्रातील राजकारणात ( politics in Maharashtra ) सत्ताबदल झाल्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत यात शंका नाही. पण राजकारणाच्या या तारीख पे तारीख मुळे पालिका निवडणुकीत इच्छुक असणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. लोकांची आजी-माजी लोकप्रतिनिधींची नियोजित विकास कामे थांबली. पण पालिका निवडणुकीला मात्र मुहूर्त सापडत नाही आहे. पालिका निवडणुकांना विलंब या राजकीय खेळखंडोबामुळे झालेलेच आहे. पण दुसरीकडे यामध्ये ओबीसी आरक्षणाचा वाद अद्याप मिटलेला नाही.ओबीसी समाजाला न्याय मिळू शकलेला नाही. अन जो पर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तो पर्यंत निवडणूक होणे शक्य नाही.
मतपरिवर्तनासाठी वेळ लागतोय - सत्ताधारी पक्ष बंडाळी आणि गद्दारीनंतर जनमानसाच्या मतपरिवर्तन करेपर्यंत पालिका निवडणूक होऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठी गणिताची आकडेवारी जमवा-जमवी सुरु आहे. हे एक कारण निश्चितच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालिका निवडणूक होणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य माणूस आणि लोकप्रतिनिधी, इच्छुक विचारात आहेत. मात्र अद्यापघि चित्र स्प्ष्ट नाही. ओबीसी आरक्षण आणि त्याची अंमलबजावणीचा प्रवास हा सत्ताधारी कधी सोडवितात हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिका निवडणूक मात्र अद्यापही दूरवरचा असलयाचे चित्र दिसत असल्याचे, जेष्ठ पत्रकार सुरेश साळवे व संजय भालेराव आणि ओबीसी नेते प्रफुल वाघोले यांनी म्हटले आहे.