महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालिका आयुक्तांचा विना तिकीट रेल्वे प्रवासी पाहणी दौरा - ठाणे जिल्हा बातमी

राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना क्यूआर कोडसह लोकल रेल्वेत प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्याची आवश्यक पूर्तता करण्यासाठी पालिका प्रशासनाला आदेश दिले आहे. तेच नियोजन पाहण्यासाठी ठाणे पालिका आयुक्तांनी पोलीस बंदोबस्तात विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दौरा केला. मात्र, त्यांनी रेल्वेचे तिकीटच घेतले नव्हते.

पाहणी करताना आयुक्त
पाहणी करताना आयुक्त

By

Published : Aug 11, 2021, 6:52 PM IST

ठाणे -राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासासाठी सर्व सामन्यांना सशर्त मुभा दिली आहे. दोन लस घेतलेल्या नागरिकांसाठी क्यूआर कोडसह प्रवास करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक ती पूर्तता पालिका प्रशासनाला करण्याचे आदेशही दिले आहेत. त्याचेच नियोजन कसे सुरू आहे हे पाहण्यासाठी ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यासह ठाणे ते दिवा, असा प्रवास करत कळवा दिवा स्थानकात क्यूआर कोड पाहणी केली. हा प्रवास पालिका आयुक्तांनी विना तिकीट केल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे ठाण्यात डेल्टा व्हेरियंट असलेले तीन रुग्ण आढळल्यावर आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर आहे. आता 15 ऑगस्ट पासून दोन लस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला संबंधित जवाबदारी देण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांचे दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र व आधारकार्ड तापसून पासच्या फॉर्मवर पालिकेचा शिक्का तिकीट काउंटरजवळ दिला जात आहे.

पहाणी दौरा

हाच पहाणी दौरा पालिका प्रशासनाने आयोजित केला होता त्यात पालिका आयुक्त विपीन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे लसीकरण प्रमुख डॉ. खुशबू या आपल्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरक्षा व्यवस्थेत सहभागी झाले होते. त्यांनी ठाणे स्थानकातून प्रवास सुरू केला ते मुंब्रा स्थानकात उतरले, तेथील आढावा घेतल्यावर दिवा स्थानकात गेले. त्यानंतर पुन्हा ठाण्याला विनातिकीट लोकल प्रवास केला.

रेल्वेचे म्हणणे

या संदर्भात विना तिकीट करण्याची परवानगी आयुक्त आणि पालिका अधिकाऱ्यांना आहे का, असा प्रश्न मुख्यजन संपर्क अधिकारी ए.के.जैन यांना विचारणा केली असता त्यांनी जर त्यांनी प्रवास करताना त्यांना टीसीने (तिकीट निरीक्षक) अडवले असते. तर त्यांच्यावर कारवाई झाली असती, अशी माहिती दिली. त्यासोबत कोणालाही विना तिकीट प्रवास करण्याची मुभा नसल्याचे सांगितले.

पालिका प्रशासन म्हणते माहिती घेऊ

या विना तिकीट प्रवासाबाबत पालिका प्रशासनाची प्रतिक्रिया विचारल्यावर आम्ही माहिती घेऊन सांगू, अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

हेही वाचा -दिल्लीच्या बंटी बबलीचा ठाण्याच्या कल्पनाला 3 लाखाला गंडा; सुखासाठी दिला 'हा' सल्ला अन्...

ABOUT THE AUTHOR

...view details