ठाणे -डॉ. विपीन शर्मा यांनी आज महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. पहिल्याच दिवसांपासून डॉ. शर्मा यांनी शहराची पाहणी मोहिम हाती घेतली. त्यांनी कोरोना फिल्डमध्ये जाऊन कोवीड-१९ बाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच संपूर्ण लोकमान्यनगर, सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली.
आयुक्त डॉ. शर्मा यांनी लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात कोरोनाचे किती रूग्ण आहेत. त्यासाठी काय उपाययोजना राबवल्या जात आहेत याची माहिती घेतली. प्रभागांमध्ये सुरू असलेल्या फिव्हर क्लिनिकला आयुक्तांनी भेट दिली. तेथील डॉक्टरांशी संवाद साधून नेमके कशाप्रकारे काम चालते याची माहिती घेतली. कंटेन्मेंट झोनला भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधला. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी त्यांच्या समवेत उप आयुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त नयना ससाणे, डॉ. चारूशीला पंडीत आदी अधिकारी उपस्थित होते.
वॉर रूमला भेट -