महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महानगरपालिकेचा अजब कारभार; कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा ठरवले जातेय पॉझिटिव्ह - ठाणे महानगरपालिका न्यूज

दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या तरुणाला तो पुन्ह एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा महानगरपालिकेतून फोन येत आहे. महानगरपालिकेसोबत स्थानिक पोलीस देखील क्वारंन्टाईन होण्यासाठी त्याला धमकावत आहेत. या प्रकाराने धास्तावलेल्या तरुणाने व त्याच्या कुटुंबीयांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली.

Corona cured boy
कोरोनामुक्त तरूण

By

Published : Jul 18, 2020, 1:26 PM IST

ठाणे - शहरातील दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या तरुणाला तो पुन्ह एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा महानगरपालिकेतून फोन येत आहे. तुमचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तुम्हाला क्वारंटाईन करण्यात येणार आहोत, असे वारंवार फोन या तरुणाला येत आहेत. महानगरपालिकेसोबत स्थानिक पोलीस देखील क्वारंन्टाईन होण्यासाठी त्याला धमकावत आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या तरुणाला पुन्हा कोरोनाबाधित ठरवले जात आहे

या प्रकाराने धास्तावलेल्या तरुणाने व त्याच्या कुटुंबीयांनी अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली. मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तरुणाला धीर दिला आहे. एकदा कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा बाधित ठरवून रूग्ण संख्या वाढवण्याचा अट्टाहास का केला जात आहे? यामागे अर्थकारणाचे गौडबंगाल आहे का? असा थेट सवाल पुष्कराज विचारे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला केला आहे. पालिकेने या भोंगळ कारभाराची चौकशीकरून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडून वारंवार फोन आल्याने कोरोनामुक्त तरुणाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरी येऊन गेल्याने तरुणाच्या कुटुंबाकडे शेजारी संशयी नजरेने बघत आहेत, अशी प्रतिक्रीया या पीडित तरुणाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details