ठाणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी (11 सप्टेंबर) सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांच्या विरोधात आणि दुकानात देखील मास्क न घालणाऱ्यांवर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आज पालिका अधिकारी, पोलीस व कर्मचाऱ्यांनी 9 प्रभाग समित्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी 9 प्रभाग समित्यांमध्ये बाजारपेठा आणि दुकानांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सामान्य नागरिक हा दंड भरावा लागू नये म्हणून मास्क वापरतील, असा महापालिका आयुक्तांचा आदेश देण्यामागील हेतू होता.
हेही वाचा-लष्करात अधिकारी आणि जवानांना वेगवेगळे जेवण का?
पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता निरीक्षक, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण व कर विभागाचे बीट निरीक्षक, बीट मुकादम त्याचप्रमाणे पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
पालिकेकडून विनामास्क व्यक्तींकडून ५०० रूपये दंड वसूल करण्यात यावा, असे असे आदेशात नमूद करण्यात आल आहे. दंड वसूल करणे हा उद्देश नसून मास्कचा वापर बंधनकारक करणे हा आहे. नागरिकांनी कोरोनाविरूद्धच्या लढाईमध्ये महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.