महाराष्ट्र

maharashtra

'नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई'

By

Published : May 15, 2020, 9:35 AM IST

महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईचे काम देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी महानगरपालिका आयुक्त आग्रही आहेत. नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Thane Municipal Corporation
ठाणे महानगरपालिका

ठाणे -सलग दुसऱ्या दिवशी महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी अनेक ठिकाणी पावसाळापूर्व नाले सफाईच्या कामाची पाहणी केली. नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नाल्यांची तळापर्यंत सफाई करावी, असे आदेश आयुक्त सिंघल यांनी दिले.

महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईचे काम देखील वेळेत पूर्ण व्हावे यासाठी महानगरपालिका आयुक्त आग्रही आहेत. यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही निविदा मागवून प्रभाग समितीनिहाय कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील नालेसफाई कामाचा वेग वाढला असून आयुक्तांचे नालेसफाईच्या कामाकडे काटेकोर लक्ष आहे.

नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व नाल्यांची खोलवर सफाई करून संपूर्ण गाळ काढण्याचे आदेश त्यांनी ठेकेदारांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्यात महानगरपालिका आयुक्त सिंघल यांनी वंदना, पनामा, मुलुंड चेकनाका, ब्राडमा, आयटीआय सर्कल, लक्ष्मी पार्क, कोरम नाला, बटाटा कंपनी येथील नाल्यांची पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details