महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालिका आयुक्तांचा वागळे प्रभाग दौरा, अस्वच्छतेच्या कारणावरून स्वच्छता निरीक्षक जागेवरच निलंबित - वागळे प्रभाग समिती ठाणे बातमी

आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी वागळे प्रभाग समितीतंर्गत शांतीनगर परिसराची पाहणी केली. दरम्यान सीपी तलाव परिसरातील अस्वच्छतेच्या कारणावरून तेथील स्वच्छता निरीक्षकास जागेवरच निलंबित करून स्वत:च त्याच्या निलंबनाचा आदेश लिहून आस्थापना विभागाकडे दिला. तसेच आज सायंकाळपर्यंत त्या परिसराची साफसफाई करण्याचे आदेश दिले.

महापालिका आयुक्तांचा वागळे प्रभाग समितीचा दौरा
महापालिका आयुक्तांचा वागळे प्रभाग समितीचा दौरा

By

Published : Jul 8, 2020, 5:28 PM IST

महापालिका आयुक्तांचा वागळे प्रभाग समितीचा दौरा

ठाणे :ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज(बुधवार) वागळे प्रभाग समितीतंर्गत शांतीनगर, सीपी तलाव तसेच किसननगर फिव्हर ओपीडीला भेट देवून माहिती घेतली. दरम्यान सीपी तलाव परिसरात अस्वच्छतेच्या कारणावरुन महापालिका आयुक्तांनी तेथील स्वच्छता निरीक्षकास जागेवरच निलंबित केले.

आज सकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी वागळे प्रभाग समितीतंर्गत शांतीनगर परिसरातील सर्व गल्ल्यांची पाहणी केली. तेथील नागरिकांशी साफसफाई बाबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी किसननगर फिव्हर ओपीडीला भेट दिली आणि तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सीपी तलाव परिसराला भेट देवून स्थानिक नगरसेविका आणि वागळे प्रभाग समिती अध्यक्षा शिल्पा वाघ, माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ यांच्याशी संवाद साधून तिथल्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे हेही उपस्थित होते.

दरम्यान सीपी तलाव परिसरातील अस्वच्छतेच्या कारणावरून तेथील स्वच्छता निरीक्षकास जागेवरच निलंबित करून स्वत:च त्याच्या निलंबनाचा आदेश लिहून आस्थापना विभागाकडे दिला. तसेच आज सायंकाळपर्यंत त्या परिसराची साफसफाई करण्याचे आदेश दिले. या पाहणी दौऱ्यामध्ये उप आयुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार जाधव उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details