महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापालिका आयुक्तांनी पिंजून काढली नौपाडा प्रभाग समिती ; कोरोनामुक्त रूग्णांशीही साधला संवाद - महापालिका आयुक्त डॅा विपिन शर्मा

महापालिका आयुक्त डॅा विपिन शर्मा यांनी जवळपास चार तास नौपाडा प्रभाग समिती पिंजून काढली. या भेटीत त्यांनी आनंदनगर येथे सुरू असलेले फिव्हर क्लिनिक, सार्वजनिक शौचालये, तसेच गल्ल्यांमध्ये जावून तेथील स्वच्छता, साफसफाई, नाले सफाई आदींची पाहणी केली. यानंतर त्यांनी चेंदणी कोळीवाडा प्रतिबंधिक क्षेत्राची पाहणी केली.

नौपाडा प्रभाग
नौपाडा प्रभाग

By

Published : Jul 2, 2020, 10:33 AM IST

ठाणे - महापालिका आयुक्त डॅा विपिन शर्मा यांनी जवळपास चार तास नौपाडा प्रभाग समिती पिंजून काढली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी कोरोना मुक्त रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. महापालिका आयुक्तांनी महापौर नरेश म्हस्के यांच्या समवेत कोपरी आनंदनगर परिसराची पाहणी केली. या भेटीत त्यांनी आनंदनगर येथे सुरू असलेले फिव्हर क्लिनिक, सार्वजनिक शौचालये, तसेच गल्ल्यांमध्ये जावून तेथील स्वच्छता, साफसफाई, नाले सफाई आदींची पाहणी केली. यानंतर त्यांनी चेंदणी कोळीवाडा प्रतिबंधिक क्षेत्राची पाहणी केली.

चेंदणी कोळीवाडा परिसरात त्यांनी एकविरा देवी मंदीर, विठ्ठल मंदीर रोड, स्व. नारायणराव कोळी चौक, कोळीवाडा गाव, मीठबंदर रोड, चंद्रकांत नाखवा कोळी चाळ, सिमेंट गल्ली, युनायटेड स्पोर्टस, आनंदभारती, हरियाली तलाव, राऊत शाळा या परिसराची पाहणी केली. तसेच या परिसरातील कोरोनामुक्त रूग्णांच्या घरांना भेटी देवून त्यांच्याशी विचारपूस केली.

चेंदणी कोळीवाड्यानंतर डॅा. शर्मा यांनी बी केबीन, रेल्वे लाईन येथील प्रतिबंधीत क्षेत्राची आणि जांभळी नाका मुख्य धान्य बाजाराची फिरून पाहणी केली. तसेच नागसेन नगर, खारटन रोडचीही पाहणी केली. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, सुनील हंडोरे उपस्थित होते. यावेळी डॅा. शर्मा यांनी हाजुरी, मनोरूग्णालय परिसराची पाहणी करून तेथील माहितीही जाणून घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details