ठाणे- टोईंगच्या नावाखाली बनावट पावती फाडणाऱ्या टोळीला ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी चोप दिला. गेली अनेक दिवस आनंद नगर चेक नाका येथे रात्री २ वाजता महाराष्ट्राच्या बाहेरील गाड्या अडवून एक टोळी जबरण बनावट पावत्या फाडून लुटा-लुट करत होते. याच दरम्यान हे लोक चालू गाडीच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर फ्लॅश लाईट मारायचे त्यामुळे या ठीकाणी काही अपघात सुद्धा झाले आहेत.
पुन्हा एकदा ठाणे पॅटर्न ! बनावट पावती फाडणाऱ्या टोळीला 'मनसे' चोप - टोइंगच्या
ठाण्यात टोईंगच्या नावाखाली बनावट पावती फाडणाऱ्या टोळीला मनसे कार्यकर्त्यानी दीला चोप

ही टोळी लाठ्या-काठ्याचां धाक दाखवून हा प्रकार करत होते, अशा प्रकारच्या तक्रारी काही दिवस मनसे ऑफिसला येत होत्या. आज मनसेचे कार्यकर्ते २ वाजता घटनास्थळी पोहचले आणि होणाऱ्या प्रकाराबद्दल वाहतूक पोलिसांना जाब विचारला. पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, येथील टोईंग टोळी दादागिरीची भाषा करायला लागली. यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी त्या टोईंग टोळीतील लोकांना बेदम चोप दिला.
यावेळी ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, आशिष डोके, मनविसे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर, प्रभाग अध्यक्ष विनायक रणपिसे, जनार्दन खरीवले, सागर कदम, रोशन वाडकर, विकास मोरे, अभिजीत बाफलेकर, सुरेश तुंगीकर सहभागी होते.