महाराष्ट्र

maharashtra

ठाणे महापालिका आयुक्तांनी केली खड्ड्यांची पाहणी, तातडीने खड्डे भरण्याचे दिले आदेश

आज सकाळपासूनच महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांची पाहणी करायला सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यांतर्गत त्यांनी दालमिल चौक येथील रस्त्यांची पाहणी करून एका बाजूला राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. सदरचे काम आजच्या आज सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.

By

Published : Aug 19, 2020, 10:14 PM IST

Published : Aug 19, 2020, 10:14 PM IST

ठाणे महापालिका आयुक्त
ठाणे महापालिका आयुक्त

ठाणे- संततधार पावसामुळे शहरात खड्डे पडल्याच्या तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज शहरातील खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी शर्मा यांनी तातडीने खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दरम्यान, खड्डे भरण्याचे काम सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही शर्मा यांनी दिला.

माहिती देताना ठाणे महापालिका आयुक्त

आज सकाळपासूनच महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांची पाहणी करायला सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यांतर्गत त्यांनी दालमिल चौक येथील रस्त्यांची पाहणी करून एका बाजूला राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. सदरचे काम आजच्या आज सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.

दालमिल चौक नंतर महापालिका आयुक्तांनी एम्को कंपनी येथील रस्त्यांची पाहणी करून रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम, तसेच चेंबर कव्हर्स तातडीने बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तीन हात नाका, कशीश पार्क, तसेच तीन हात नाका ते लूईसवाडी येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून तेथील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त शर्मा यांनी तीन हात नाका उड्डाण पुलावरील खड्ड्यांची पाहणी करून ते खड्डे तातडीने भरण्यासंदर्भात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दौऱ्यात त्यांच्या समवेत उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रविंद्र खडताळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, उपनगर अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा-'तुमच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही करू'...सेनेचा अभिनव उपक्रम!

ABOUT THE AUTHOR

...view details