ठाणे -काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिकेला 10 एमएलडी वाढीव पाणी देण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महापौर म्हस्के यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी ठाण्याला पाणी वाढवून द्या नाहीतरी जेसीबी लावून स्टेम कार्यालय पाडून टाकण्याचा इशारा नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिला. ठाण्याला मिळणाऱ्या पाण्यावरून महापौर संतापल्याचे दिसून आले आहे.
सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून 113 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. वास्ताविक पाहता स्टेम प्राधिकरणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे योगदान मोठे आहे. ठाणे महानगरपालिकेला वाढीव पाणीपुरवठा करण्यामध्ये स्टेमकडून कुचराई करण्यात येते. याचा परिणाम ठाण्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. इतर महानगरपालिकांना वाढीव पाणी पुरवठा करण्यात येतो तर, ठाणे महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा का मिळत नाही नाही, असा प्रश्न देखील महापौरांनी उपस्थित केला आहे.
सर्वात जास्त पैसे भरुनही त्रास -