महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंडाकडून धमकीचा फोन - ठाणे महापालिका

'आम्ही छोटे गुंड नसून आमच्यापासून सावध रहा.' अशी धमकी गुंडाने ठाणे महापौर मिनाक्षी शिंदे यांना दिली आहे. याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पुढील शोध ठाणे पोलीस करत आहेत.

ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे

By

Published : Sep 18, 2019, 7:59 PM IST

ठाणे -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकीचा फोन आला आहे. चक्क कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम बोलत असल्याचे सांगून शिंदे यांना धमकी दिली आहे. "तुम्हाला कुटुंबात राहायचे आहे तर व्यवस्थित राहा, ठाण्यात कोणाशी पंगा घेऊ नका." अशी धमकी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना फोनवरून धमकी

हेही वाचा - कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे निधन

'आम्ही छोटे गुंड नसून आमच्यापासून सावध रहा.' असेही धमकावणारा म्हणत होता. याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पुढील शोध ठाणे पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध

गेल्या काही वर्षांपासून महापौर मिनाक्षी शिंदे यांनी उत्कृष्ट काम करत असल्यानेच धमक्या येत असल्याची चर्चा चालू आहे. तसेच त्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या महासभेत देखील ठोस निर्णय घेतले आहेत. काही वेळा तर मिनाक्षी शिंदे यांनी कठोर निर्णय घेऊन प्रशासनाशी दोन हात केले आहेत. दरम्यान महापौर शिंदे यांना गुंड तसेच गँगस्टर यांच्या नावाने फोन आल्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details