ठाणे- आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा ठाण्यात जोरदार प्रचार सुरू आहे. उच्चशिक्षित उमेदवार आनंद परांजपे यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत असताना अनेक सामाजिक संस्थांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मंगळवारी ओपन हाऊस, हरिनिवास सर्कल, नौपाडा पोलीस स्टेशन, मल्हार सिनेमा, भास्कर कॉलनी, बिकेबिन रोड, गोखले रोड, घंटाळी, राम मारुती रोडनंतर गावदेवी मैदान आदी ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत प्रकाश परांजपे यांच्या आठवणी जागवत नौपाडावासियांनी केले 'आनंद'चे स्वागत - आनंद परांजपे
परांजपे यांचे बालपण ज्या नौपाड्यात गेले त्या ठिकाणी परांजपे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
आनंद परांजपे
परांजपे यांचे बालपण ज्या नौपाड्यात गेले त्या ठिकाणी परांजपे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उच्चशिक्षित उमेदवार आनंद परांजपे यांच्या रुपात दिवंगत प्रकाश परांजपे यांची आठवण आल्याचे नौपाड्यातील नागरिकांनी सांगितले. यावेळी नौपाड्यातील ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच महिलांनी घराच्या बाहेर येऊन रॅलीदरम्यान परांजपे यांना अभिवादन केले. यावेळी परांजपेंनी या भागातील नागरिकांचे आशिर्वाद घेतले.