महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे मतदारसंघ : शिवसेनेच्या राजन विचारेंनी मारली बाजी, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे पराभूत

ठाण्याचा नवा खासदार कोण याचा निर्णय थोड्याच वेळात लागणार आहे.

ठाणे

By

Published : May 23, 2019, 6:05 AM IST

Updated : May 23, 2019, 7:11 PM IST

LIVEupdate -

  • शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे विजयी, राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा केला पराभव
  • 3.30 - राजन विचारे 158813 मतांनी आघाडीवर.. राजन विचारे ( शिवसेना ) - 248074, आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 89261, मल्लिकार्जुन पुजारी ( वंचित बहुजन आघाडी ) - 16466, नोटा - 6161
    ठाणे
  • 1.45 - राजन विचारे 89,888 मतांनी आघाडीवर... राजन विचारे ( शिवसेना ) - 1, 49,355, आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 59,467, मल्लिकार्जुन पुजारी ( वंचित बहुजन आघाडी ) - 11,312, नोटा - 3677
  • 12.30 - राजन विचारे 65836 मतांनी आघाडीवर.. राजन विचारे ( शिवसेना ) - 108037, आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 42201, मल्लिकार्जुन पुजारी ( वंचित बहुजन आघाडी ) - 7037, नोटा - 2795
  • 12.13 - राजन विचारे 62575 मतांनी आघाडीवर, राजन विचारे ( शिवसेना ) - 1,03,417, आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 40, 842, मल्लिकार्जुन पुजारी (वंचित बहुजन आघाडी ) - 6711, नोटा - 2664
  • 11.22 - राजन विचारे 44511 मतांनी आघाडीवर, राजन विचारे ( शिवसेना ) - 75692, आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 31181, मल्लिकार्जुन पुजारी ( वंचित बहुजन आघाडी ) - 3787, नोटा - 2079
  • 11.04 - पहिल्या फेरीत 147 कोपरी पाचपाखडी 6 नंबर टेबलवर एका ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड.. 151 नवी मुंबई बेलापूरमध्येही मशीन बिघडले..एकूण 2 मशीन मध्ये बिघाड... एका संगणकामध्ये बिघाड.
  • 10.40 - तिसरी फेरी - राजन विचारे ( शिवसेना ) - 37860 मते, आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 19919 मते, लीड - राजन विचारे 17 हजार 941
  • 10.20 - शिवसेना उमेदवार राजन विचारे १७ हजार ९०० मतांनी आघाडीवर
  • 9.40 - राष्ट्रवादी - आनंद परांजपे- 8551 मते, शिवसेना- राजन विचारे- 16327 मते
  • 8.55 - शिवसेना उमेदवार राजन विचारे ८ हजार मतांनी आघाडीवर
  • 8.40 - पहिला राऊंड पूर्ण राजन विचारे आघाडीवर, ठाणे शहर मधून 5 हजार तर ऐरोली मतदार संघातून साडे तीन हजार इतका लीड सध्या आहे.
  • 8.01 - ठाण्यात मतमोजणीला सुरुवात

ठाणे - ठाण्याचा नवा खासदार कोण याचा निर्णय थोड्याच वेळात लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या ठिकाणी शिवसेनकडून विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद पंराजपे हे रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिलला येथील मतदान पार पडले. ठाण्यात यावेळी ४९.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ च्या तुलनेत यावेळी जवळपास दीड टक्के मतदान कमी झाले. २०१४ मध्ये ठाण्यात ५०.८७ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या टक्केवारीत विशेष फरक न पडल्याने येथे कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

२०१४ च्या निवडणुकीच्या मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे अनपेक्षितपणे निवडून आले होते. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधी लाट आली आणि राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, भूमिपुत्र, मराठी, आगरी मतदारांची मोठ्या प्रमाणात संख्या होती तोपर्यंतच ठाण्यात शिवसेनेचा किल्ला राहिला. परंतु, कालांतराने ठाण्याचे वाढलेले नागरीकरणामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात बहुजनाचा, विविध जाती जमातीचा वावर वाढला. याच कारणामुळे शिवसेनेतून राष्ट्रवादीत घरोबा केलेल्या गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत संजीव नाईक यांनी विजय मिळवला.

थोडक्यात ठाणे मतदारसंघात एकाच पक्षाला अनेकवर्ष सत्ता काबीज करण्याचे भाग्य हे शिवसेनेला त्या काळात मिळाले. त्यानंतर मात्र या मतदारसंघातील कब्जेदार सतत बदलत राहिले.

पक्षीय बलाबल -

ठाणे लोकसभा मतदारसंघातील आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. ठाणे, मीरा भाईंदर आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप तर कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि ठाणे यामध्ये शिवसनेचे आमदार आहेत. मात्र, हे सर्व आमदार जवळपास मोदी लाटेच्या अनुषंगाने निवडून आल्याने यावेळी लाटेच्या आधारावर ही निवडणूक जिंकणे विचारेंना कठीण जाणार आहे. एवढ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात केवळ एरोली मतदारसंघात राष्ट्रवादीला यश मिळवता आले आहे.

Last Updated : May 23, 2019, 7:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details