मुंबई Thane Lift Accident :ठाण्यात रुणवाल कॉम्प्लेक्समधील ४० मजल्याच्या इमारतीतील दुघटनाग्रस्त लिप्ट तीन महिन्यांपासून नादुरुस्त होती. अशातच रविवारी काहीशी डागडुजी करुन लिफ्ट सुरु करण्यात आली होती. दरम्यान लिफ्टला वायर रोप नव्हते तर दोरखंड लावण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणी आता कापूरबावडी पोलिसांनी लिफ्ट ठेकेदारासह मजूर ठेकेदारावर भादंवि ३०४(२), ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी सुनिल कुमार दासच्या भावाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार रविवारी उशिरा रात्री तक्रार दाखल केली होती. यानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. (Thane Lift Accident)
या दुर्घटनाग्रस्त इमारतीनधील लिफ्ट मध्ये तांत्रीक बिघाड झाल्याने यात सात लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेला विकासकाचा हलगर्जीपणा जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही पोलीसांना पत्र लिहिलंय. - अभिजित बांगर, महापालिका आयुक्त, ठाणे मनपा
-
विकासकाला वाचविण्याचा प्रयत्न? :रुणवाल कॉम्प्लेक्समधील इमारतीत घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी विकासकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मजूर ठेकेदार आणि लिफ्ट ठेकेदारांवर गुन्हा दाखल केल्यानं संशयाचं वातावरण निर्माण झालंय. यामुळे याप्रकरणात ठाण्यात विविध चर्चा रंगल्या आहेत.