महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुन्हे शाखेची धडक कारवाई; घरफोडी करणारे तीन आरोपी गजाआड

ठाण्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातही चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

Jewellery
दागिने

By

Published : Dec 22, 2020, 12:16 PM IST

ठाणे - पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कोपरी, श्रीनगर आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या आणि चोऱ्या करून हैदोस घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखे अटक केली आहे. वसंत चव्हाण यांच्या घरात घुसून चोरट्याने ३ लाख ९ हजाराचा मुद्देमाल लांबवला होता. सदर प्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने खबऱ्यांच्या माहितीवरून दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. या दोघांवर विविध पोलीस ठाण्यात ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली

आरोपींकडून मुद्देमाल जप्त -

अटक आरोपीमध्ये कुणाल सुरेश जगताप(वय २४ रा. सिद्धार्थनगर कोपरी, ठाणे) आणि अमित प्रदीप जगताप(वय-२६ रा. सिन्नर जि.नाशिक) यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. यातील आरोपी अमित जगताप याला रेल्वे पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेने कोपरी पोलिसांची स्वाधीन केले.

दुसऱ्या एका आरोपीला अटक -

आणखी एका घरफोडीसाठी गुन्हे शाखा युनिट- ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक सीताराम धनवाल याला अटक केली आहे. हा आरोपी यशोधन नगर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी दीपक धनवाल (रा. लोकमान्यनगर, पाडा नं ३ ठाणे) याला अटक केली. त्याने वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या दोन धडक कारवायांमध्ये ५ घरफोड्या आणि एक ऑटोरिक्षा चोरीचा उलगडा झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद तावडे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details