ठाणे -ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले मुंब्रा कौसा येथील ६०० बेडचे मिनी जम्बो कोविड सेंटर धूळखात पडले असल्याचे चित्र आहे. हे जम्बो कोविड सेंटर धूळखात पडण्याचं नेमकं कारण काय आहे ? हे समोर आले नसून धक्कादायक म्हणजे या सेंटर मधील अनेक साहित्य चोरीला गेल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी केला होता. हे वोल्टास कंपनीच्या जागेवर असलेले जम्बो कोविड सेंटर दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उभारण्यात आले होते. तर मुंब्रा कौसा येथील स्टेडियममधील मिनि जम्बो कोविड सेंटर हे पहिल्या कोविड लाटेत सुरु करण्यात आले होते.
दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे. असे असताना देखील ठाणे महानगरपालिकेच्या हजारो खाटा या धुळखात पडल्याचे चित्र आहे. मिनि जम्बो कोविड सेंटर नियोजन करण्यात ठाणे महानगरपालिकेला अपयश आल्याचे बोलल्या जात आहे. महानगरपालिकेचे नियोजन हे शून्य असल्याचे या दोन्ही धुळखात पडलेल्या कोविड सेंटरवरून लक्षात येत आहे. तर हे जम्बो कोविड सेंटर सुरू कधी केले जाणार महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी केला आहे. एकीकडे रुग्णांना बेड नसल्याने बेड शोधण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ठाणे महानगरपालिकेने कोविडच्या काळात केलेलं काम हे कौतुकास्पद आहे. मात्र दुसऱ्या लाटेत कोविड सेंटर उभारण्यात आले. मात्र ते रुग्णांच्या सेवेत आणण्यात महानगरपालिकेला अपयश आल्याचा आरोपही होत आहे.