ठाणे -एकीकडे गटारावर झाकण नसल्यामुळे दुचाकीसह चालक खोल गटारात पडला तर दुसरीकडे महापालिकेने खोदलेल्या खड्ड्यात अजून एक दुचाकीस्वार पडला आहे. हा सर्व प्रकार आहे शनिवारी उल्हासनगर शहरात घडला. मात्र या घटनेमुळे पालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर शहरात रात्रभर जोरदार पाऊस पडत होता, त्यामुळे शहरातील गटारे, नाले दुथडी भरून वाहत होते. गटारे भरून पाणी वाहत असल्याने त्यावर झाकण आहे की नाही याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार थेट गटारात पडल्याची घटना अमन टॉकीज रोडवर घडली. तर दुसरा प्रकार फर्निचर मार्केटमध्ये घडला. त्यानंतर आसपासच्या लोकांनी दोघांनाही बाहेर काढले असून दोघेही सुखरूप आहेत.