महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक काळात लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त; १३० गुन्हे दाखल तर ८९ जणांना अटक - exise duty

काहीवेळा लॅपटॉपच्या बॅगमधूनही ने-आण केली जाते. तर खाडीत आतमध्ये खारफुटीच्या जंगलात हातभट्टीची दारू तयार केली जाते. तेव्हा बोटीतून प्रवास करून हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते.

लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

By

Published : May 26, 2019, 5:25 PM IST

ठाणे - राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या फ्लाइंग स्कॉर्डने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केलेल्या कारवाई सुमारे ५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ४२ लाखांच्या मद्य साठ्यांचा समावेश आहे. या कारवाईत एकूण १३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ८९ जणांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गावठी दारूच्या हातभट्यावर कारवाई करून उद्धवस्त करण्यात आल्या.

लाखो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त

निवडणूक काळात अनेकदा परराज्यातील मद्य चोरून आणले जाते. विशेषकरून गोवा, दिव, दमण येथील दारूचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. हे मद्य खासगी बसमधून चोरून आणले जाते. त्यामुळे गुजरात, गोवासह इतर राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर फ्लाइंग स्कॉर्डची विशेष नजर असते. अनेकदा गावठी आणि हातभट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबले जातात. यात दुधाच्या किटलीत वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते. काहीवेळा लॅपटॉपच्या बॅगमधूनही ने-आण केली जाते. तर खाडीत आतमध्ये खारफुटीच्या जंगलात हातभट्टीची दारू तयार केली जाते. तेव्हा बोटीतून प्रवास करून हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते. ठाणे फ्लाइंग स्कॉडचे निरीक्षक सुनील कणसे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संजय पुरळकर, विजय धुमाळ, जवान बोडरे, वझे, जानकर, धुमाळ, तडवी, सुतार यांच्या पथकाने ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आदी पट्ट्यातील गावठी दारूच्या हातभट्यावर धडक कारवाई करून उद्धवस्ती करण्यात आल्या.

लोकसभा निवडणूक काळात अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फ्लाइंग स्कॉर्डने कंबर कसली होती. यात ११ मार्च ते २३ मे या कालावधीत पथकाने १ लाख ५५ हजार ५५० लिटर रसायन, ६ हजार ७०५ हातभट्टीची देशी १३५ लिटर, विदेशी १२४ लिटर, २७३ लिटर बिअर, ताडी ३५५ लिटर, नीरा २४५ लिटरची दारू जप्त केली. यामध्ये ८३ वारस गुन्हे, तर ४७ बेवारस गुन्हे दाखल आहेत. यात ८९ जणांना अटक झाली आहे. तर २७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यांची किंमत १४ लाख ७० हजार आहे. तर ४२ लाख ९७ हजार ४३१ रुपयांचा अवैध मद्यसाठा असा एकूण ५७ लाख ६७ हजार ४३१ इतका मुद्देमाल जप्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details