महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shambhuraj Desai : सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजुने लागेल शंभूराज देसाई यांचे ठाण्यात वक्तव्य - Election Commission

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजुने लागेल असे वक्तव्य ठाण्यात केले आहे. १४ फेब्रुवारीचा निकाल निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय आमच्याच बाजूने निकाल देतील असा विश्वास यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला.

Shambhuraj Desai
Shambhuraj Desai

By

Published : Feb 8, 2023, 11:11 PM IST

सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजुने लागेल

ठाणे :महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. जिल्ह्यातील शाळा ‘मॉडेल स्कूल’ करण्याबाबत आणि आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर’ उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्य़ांना दिले.

शंभूराज देसाई

उद्धव गटावरती सडकून टीका :सत्ता संघर्षावर शंभुराजे देसाई यांनी सत्ता संघर्षाचा 14 फेब्रुवारीला लागणारा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास देखील व्यक्त केला. त्याचप्रमाणे उद्धव गटावरती सडकून टीका देखील केली. राज्यातील या सत्ता संघर्षांमध्ये सर्वात जास्त आमदार, खासदार आमचे आहेत, त्यामुळे निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आमच्याच बाजूने निकाल देतील असा विश्वास यावेळी ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला.

शंभूराज देसाई

नेमके काय म्हणाले शंभूराज :निवडणूक लढवताना माननीय मोदी साहेबांचे ठाकरे साहेबांचे फोटो लावून मत मागून निवडून आलेले आम्ही इथे बसलेले आमदार आहोत. माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये ज्या तरतूद आहेत. त्याच्यावरती आमचा विश्वास आहे असे ते म्हणाले.

ठाण्यासाठी 580 कोंटींची मागणी : जिल्हा वार्षिक योजनेतून ठाणे जिल्ह्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राज्यस्तरीय बैठकीत मागणी केली आहे. सन २०२३-२४ या वर्षासाठी ठाणे जिल्ह्याकरिता ८५० कोटी रुपये इतक्या निधीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासाठी आणखी विशेष वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या तृणधान्यविषयक पोस्टरचे शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

हेही वाचा -Asaduddin Owaisi On Hindenburg : हिंडेनबर्ग प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असदुद्दीन ओवेसींचा प्रहार

ABOUT THE AUTHOR

...view details