ठाणे :मॉन्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन पोहचला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा आपत्ती उद्भवत असते. पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असून सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. या आपत्तींमध्ये नागरिकांची मदत करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 2018 साली ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली. या आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून अनेक मोठे मोठ्या आपत्तींचा सामना करण्यात आला आहे. केवळ ठाणे जिल्ह्यातच नाही तर, ठाणे जिल्ह्याबाहेरील देखील अनेक आपत्तीमध्ये नागरिकांना मदत याच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने केली आहे.
आपत्ती प्रतिसाद दलाचे काम: तळी सारखी भयंकर आपत्तीला देखील, ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल सामोरे गेले होते. भूस्खलन, झाडे कोसळून होणारी आपत्ती यासाठी प्रामुख्याने हे दल कार्यरत असते. विशेष म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस पावसाळ्यात वांगणी या ठिकाणी अडकली होती. यावेळी महालक्ष्मी एक्सप्रेस मधील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये आपत्ती प्रतिसाद दलाचे मोठे योगदान होते. ठाणे आपत्ती प्रतिसाद दल हे अनेक आपत्तींमध्ये नागरिकांची मदतीसाठी सरसावले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा आपत्ती उद्भवत असते. केवळ ठाणे जिल्ह्यातच नाही तर, ठाणे जिल्ह्याबाहेरील देखील अनेक आपत्तीमध्ये नागरिकांची मदत याच ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने केली. यंदा देखील पावसाळ्यातील उद्भवणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी ठाणे महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद दल सज्ज आहे. - वरिष्ठ जवान सचिन दुबे