महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime: ज्वेलर्सचे सव्वा तीन कोटींचे सोने चोरणाऱ्या तिघांना अटक, टोळीचे धागेदोरे थेट नेपाळपर्यंत!

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 8:40 AM IST

Updated : Aug 23, 2023, 9:34 AM IST

ज्वेलर्सच्या दुकानातून 3 कोटी 20 लाख रुपयांच्या दागिने पळवणाऱ्या 3 सराईत चोरांना ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाच्या पोलिसांनी अटक केली. घोडबंदर रोड परिसरात ही अटकेची कारवाई करण्यात आली. जून महिन्यात उल्हासनगरमधील झवेरी बाजारमध्ये असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडली होती.

ठाण्यात तीन चोरांना अटक
ठाण्यात तीन चोरांना अटक

ठाण्यात तीन चोरांना अटक

ठाणे : उल्हासनगरमधील झवेरी बाजारातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घोडबंदर रोड येथून अटक केली. दिनेश उर्फ सागर चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल आणि दीपक रामसिंग भंडारी, अशी या चोरांची नावे आहेत. हे सर्वजण नेपाळमधील रहिवासी आहेत. या आरोपींच्या नावावर मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा उप आयुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

6 किलो सोनं लंपास : उल्हासनगरमधील झवेरी बाजारात असलेल्या ज्वेलर्स दुकानात 26 जून 2023 रोजी 3 चोरांनी दरोडा टाकला होता. या चोरांनी दुकानातून 6 किलो सोन्याची चोरी केली. भर बाजारातील दुकानात चोरी झाल्यानं खळबळ उडाली होती. दरम्यान चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी नेपाळात आश्रय घेतला होता. हे चोर दोन महिन्यानंतर पुन्हा ठाण्यात आल्याची माहिती गुन्हे मालमत्ता शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारे या तिन्ही आरोपींचा शोध घेतला.

दुकानाचा चौकीदार फरार : ज्वेलर्स दुकानाच्या संरक्षणासाठी एका दाम्पत्याला चौकीदार म्हणून ठेवलं होतं. या चौकीदारानेच चोरांना माहिती दिली. चौकीदाराच्या माहितीच्या आधारे आरोपींनी तब्बल 6 किलो वजनी सोन्याचे दागिने चोरले. या दागिन्यांची किंमत 3 कोटी 20 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. चोरांना अटके केल्यानंतर आरोपी दिनेश उर्फ सागर, दिनेश उर्फ सागर आणि दीपक यांनी गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुन्हे शाखा मालमत्ता शाखेच्या पोलीस पथकानं या आरोपींकडून 33 लाख रुपयांचं 550 ग्राम सोनं जप्त केलंय. या चोरीमध्ये आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. या टोळीत 11 सदस्य असल्याची माहिती समोर आली. त्यापैकी 8 आरोपी अद्याप फरार असून तिघांना अटक करण्यात आली.

अशी करायचे चोरी : ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यात अनेक चोरांचा समावेश आहे. त्यांचा शोध मालमत्ता विभागाचे पोलीस पथक घेत आहेत. या टोळीची चोरी करण्याची वेगळी पद्धत होती. चोर विविध ठिकाणी नोकरी करून रेकी करायचे. त्यानंतर चोरीची योजना आखायचे. चोरी केल्यानंतर हे चोर थेट नेपाळ या देशात आश्रय घ्यायचे. नेपाळमध्ये गेल्यानंतर ते पुन्हा तीन ते चार महिन्यानंतर पुन्हा शहरात दाखल व्हायचे. त्यामुळे या चोरांचा शोध घेणं पोलिसांसाठी एक आव्हान ठरत होतं. दरम्यान पोलिसांच्या अटकेत असलेले 3 आरोपी दोन महिन्यानंतर नेपाळहून परत ठाण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या चोरांना घोडबंदर रोड परिसरातून अटक करण्यात आली.

हेही वाचा-

  1. कॉफी शॉपमध्ये प्रेयसीवर बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकर फरार
  2. नागपूर विमानतळावरून ३.७ किलो अ‍ॅम्फेटामाइनसारखा पदार्थ जप्त, एकाला अटक
Last Updated : Aug 23, 2023, 9:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details