महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime News: जिलेबीचे पैसे मागितल्याचा राग; हातगाडी चालकावर केला हल्ला - Jalebi seller Attack

शहरात क्षुल्लक कारणावरुन हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तर ठाणे शहरातही जिलेबी विकत घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून, आरोपीने वजनकाट्याच्या मापाने हातगाडी चालकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Thane Crime News
हातगाडी चालकावर हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 10:49 PM IST

ठाणे :शहरात जिलेबी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून जिलेबी विकत घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपीने वजनकाट्याच्या मापाने हातगाडी चालकावर हल्ला केला. दरम्यान वजन माप हे गरम तेलात पडल्याने, फिर्यादी कैलासनाथ स्वामीदयाल यादव हे जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेले. तर आरोपी सरवन याने पोबारा केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल केला.

डोक्यात केला हल्ला : आरोपी सरवन याने २५ ऑगस्ट रोजी (शुक्रवार) रात्री ९-३० वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील ममता स्विटस्, साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथील हातगाडी वरून आरोपी सरवन जिलेबी खरेदी केली. जिलेबी घेतल्यानंतर दुकानदाराने पैसे मागितले. याचा राग मनात धरून रागाने हातगाडीवरील मोजमाप लोखंडी वजन घेऊन राजेश यादव याच्या डोक्यात हल्ला केला.

चेहऱ्यावर व अंगावर तेल पडले: झटापटीत वजनाचे माप हातगाडीवरील तेलाच्या कढईत पडले आणि तेल उडून राजेश यांच्या चेहऱ्यावर व अंगावर पडून ते गंभीर भाजले. राजेश यांना औषधोपचारासाठी नॅशनल बर्न हाॅस्पीटल, ऐरोली येथे दाखल करण्यात आले आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिसांनी आरोपी सरवन याच्यावर खुनाचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

चहा पिण्यासाठी पैश्याची मागणी: या आधीही अशीच एक घटना घडली होती. ठाणे शहरात रस्त्याने पायी जात असतानाच एका गुंडाने त्याच्या साथीदाराकडे चहा पिण्यासाठी पैश्याची मागणी केली होती. मात्र कामावर जाण्यास उशीर होत असून माझ्याकडे पैसे नाही, असे साथीदाराने सांगितले होते. यामुळे संतापलेल्या गुंडाने साथीदारावर धारदार चाकूने वार करत गंभीर जखमी केले होते. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड वरील विठ्ठलवाडी बस डेपो समोर 7 ऑगस्ट रोजी घडली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details