ठाणे : इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर अल्पवयीन प्रेयसी कुटूंबासह रेल्वे प्रवास करत असतानाच २३ वर्षीय प्रियकराने तिचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. मात्र कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे प्रियकराचा शोध घेऊन त्याला ४८ तासातच बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला.
इंस्टाग्रामवर मैत्रीचे रूपांतर प्रेमात :रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी मुंबईतील धारावी परिसरात कुटूंबासह राहते. तर आरोपी कुणाल हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका गावात राहतो. त्यातच काही महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघात मैत्री होऊन त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यातच १९ ऑगस्ट रोजी पीडित प्रेयसी कुटूंबासह सोलापूरहुन कल्याणाला येणाऱ्या गडग एक्सप्रेसने आरक्षित बोगीतून प्रवास करीत होती. याच दरम्यान पीडित प्रेयसीशी रेल्वे प्रवासात बेपत्ता झाल्याची तिच्या पालकांना माहिती मिळताच, त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
पीडित मुलीला घेतले ताब्यात :घटनचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पथकासह रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी, गुन्हे शाखेचे पथक घेऊन कर्जत आणि कल्याण रेल्वे स्थानकातील घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एका फुटेजमध्ये पीडित मुलगी एकटीच कल्याण रेल्वे स्थानक एक्सप्रेसमधून खाली फलाटावर उतरून जाताना दिसून आली. त्यावेळी तिच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास केला असता, बातमीदारांकडून रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, पीडित मुलगी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मोठे वेणगावात प्रियकर कुणालच्या घरी आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गावात सापळा रचून कुणालचे घर गाठले. त्यानंतर प्रियकराच्या घरातून पीडित मुलीसह ताब्यात घेऊन कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याणात आणले.
अपहरणाचा गुन्हा दाखल : पथकाने कुणालकडे अधिक चौकशी केली असता, त्याने इंस्टाग्रामवर आमची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाल्याने तिचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दोघांना दिले. दरम्यान, पीडित मुलीला तिच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन करत प्रियकर कुणालवर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील फौजदारी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- ब्रेकअपनंतर प्रेयसीचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल केला, प्रियकराला बेड्या
- Thane Crime News : अनैतिक संबंधातून विधवा महिलेवर कोयत्याने हल्ला; प्रियकराला बेड्या
- Thane Crime News: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; अटकेनंतरही आरोपीने दाखविला माज