ठाणे :भिवंडीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईचे आदेश उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर, गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांनी दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत, मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाक्यावर मेफेड्रान (एमडी) पावडर विकण्यासाठी तस्करे येणार असल्याची माहिती मिळाली होती.
सापळा रचून व्यक्तीला पकडले : गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय मोटे, सपोनि धनराज केदार, रामचंद्र जाधव, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, सचिन साळवी, मंगेश शिरवे, शशिकांत यादव, शाबीर शेख, पोना सचिन जाधव, रोशन जाधव, प्रशांत बर्वे, अमोल इंगळे, रवींद्र साळुंखे आदी गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिकच्या दिशने जाणाऱ्या, रांजणोली नाक्याजवळील वाहतूक पोलिस चौकीजवळ सापळा रचून एका व्यक्तीला पकडले.