महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! शिक्षकाकडूनच शौचालयात 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न - Thane Crime

शाळेच्या शौचालयात एका 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. कल्याण पूर्वेतील एका नामांकित इंग्रजी शाळात ही घटना घडली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thane Crime News) (Teacher Sexually Assault Minor Boy)

Thane Crime News
शिक्षकाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

By

Published : Aug 21, 2023, 9:18 PM IST

ठाणे : शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. एका पाच वर्षीय अल्पवयीन विद्यार्थावर शिक्षकाने शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ही घटना कल्याण पूर्व परिसरातील असलेल्या एका नामांकित शाळेच्या शौचालयात घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. समीर कदम असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. (Thane Crime News) (Teacher Sexually Assault Minor Boy)

शिक्षकाने केले घृणास्पद कृत्य : मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वे भागात एक नामांकित इंग्रजी शाळा आहे. या शाळेमध्ये कल्याण पूर्व परिसरातील पाच वर्षीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यातच शिक्षकाने केलेल्या घृणास्पद कृत्याने हा पीडित विधार्थी भयभीत झाला होता. मात्र, त्यानंतर त्याच्यासोबत घडलेला प्रसंग शुक्रवारी शाळेमधून घरी आल्यानंतर आई आणि वडिलांना सांगताच त्यांना मोठा धक्का बसला. पीडित मुलाने घरच्यांना माहिती दिल्यानंतर काही तरी अनैतिक प्रकार घडला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडित मुलाच्या आई -वडिलांनी शाळेमध्ये जाऊन विचारपूस करण्याचे ठरविले. मात्र, ही घटना शुक्रवारी घडली होती. त्यातच शनिवार, रविवारी शाळा बंद होती. त्यामुळे सोमवारी पीडित मुलाचे आई- वडील शाळेमध्ये पोहचले आणि शाळा प्रशासनाकडे घडलेल्या घटनेची माहिती दिली.

शौचालयात लैगिंक अत्याचार : पीडित विधार्थासोबत शाळेच्या शौचालयात लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे, शाळा प्रशासनाच्या लक्षात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे घृषास्पद कृत्य दुसरे कोणी नाही तर शाळेच्या डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने केले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच काही तासातच कोळसेवाडी पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक करुन पुढील तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेंहद्र देशमुख यांनी दिली.

गुन्हेगारी घटनांमध्ये होत आहे वाढ : गेल्या काही दिवसांपासून कल्याण पूर्व भागात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. १५ दिवसात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न भर रस्त्यात झाला. तर दुसऱ्या अल्पवयीन १२ वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवाय दोन दिवसांपूर्वीच अल्पवयीन गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आतापर्यत सहा हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. दुसरीकडे पोलिसांकडून देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरही गुन्हेगारी वाढत असल्याने ही गुन्हेगारी थांबवण्याचे आव्हान कल्याण कोळशेवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime : मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित? विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला चार तासात अटक
  2. Sexual Abuse With Student: तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थावर शिक्षकाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  3. Sexual Assaulting Minor Girl: पनवेल रेल्वे स्थानक परिसरात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details