महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसोबत परिचारिकांनी साजरा केले रक्षाबंधन - ठाणे जिल्हा रुग्णालय रक्षाबंधन

धावपळीच्या जीवनात सणच काय तर घरी रोज एकत्र जेवणाची वेळही नशिबी येत नाही. मात्र, कुटुंबापासून दूर असलेल्या आणि  ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत येथील परिचारिकांनी रक्षाबंधन सण साजरा केला.

ठाणे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसोबत परिचारिकांनी साजरा केले रक्षाबंधन

By

Published : Aug 15, 2019, 1:30 PM IST

ठाणे -धावपळीच्या जीवनात सणच काय तर घरी रोज एकत्र जेवणाची वेळही नशिबी येत नाही. मात्र, कुटुंबापासून दूर असलेल्या आणि ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत येथील परिचारिकांनी रक्षाबंधन, सण साजरा केला.

ठाणे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसोबत परिचारिकांनी साजरा केले रक्षाबंधन

रुग्णालयात उपचार घेत असलेले किंवा कामानिमित्त घर सोडून बाहेर गेलेल्यांना आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेणे अशक्य आहे. संपूर्ण देशभरात रक्षाबंधन उत्सव साजरा केला जात असताना ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात एक आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव पाहायला मिळाला.

रुग्णालयाच्या परिचारिकांनी रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यात अशा काही परिचारिका होत्या, ज्यांना भाऊ नाहीत तर असे काही रुग्ण आहेत ज्यांचे नातेवाईक नाहीत. काही तर अनाथ होते. यावेळी अनेक रुग्णांना अश्रू अनावर झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details