ठाणे -मराठी विज्ञान परिषद आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे गावदेवी मैदानात शून्य सावली शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने दुपारी १२ वाजता गावदेवी मैदानात जमले होते. यावेळी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी शून्य सावली दिवसाबद्दल माहिती सांगितली. बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर आला त्यामुळे आपली सावली आपल्या पायाखाली गेल्याने शून्य सावलीचा अनुभव आला.
ठाणेकरांनी घेतला गावदेवी मैदानावर शून्य सावलीचा अनुभव - zero shadow
यावेळी सोमण यांनी उत्तरायण, दक्षिणायन, सूर्य, सूर्यग्रहण याविषयीही माहिती सांगितली. या ठिकाणी काही प्रयोग करण्यात आले. सिलेंडरची शून्य सावली होताना निरिक्षण करण्यात आले. शून्य सावलीचा अनुभव वर्षातून दोनदा येतो. १७ मे आणि २७ जुलैला शून्य सावलीचा अनुभव येतो.
यावेळी सोमण यांनी सर्वांना रिंगण करून उभे रहायला सांगितले होते. रिंगण केल्यानंतर एकमेकांचे हात एकमेकांना जोडल्यामुळे बरोबर खाली सावलीचे रिंगण झाल्याचे दिसत होते. असा नयनरम्य अनुभव ठाणेकरांनी गावदेवी मैदानात अनुभवला. यावेळी सोमण यांनी उत्तरायण, दक्षिणायन, सूर्य, सूर्यग्रहण याविषयीही माहिती सांगितली. या ठिकाणी काही प्रयोग करण्यात आले. सिलेंडरची शून्य सावली होताना निरिक्षण करण्यात आले. शून्य सावलीचा अनुभव वर्षातून दोनदा येतो. १७ मे आणि २७ जुलैला शून्य सावलीचा अनुभव येतो. जुलैमध्ये पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे हा अनुभव घेता येत नाही. मात्र, मे महिन्यात लख्ख ऊन पडत असल्यामुळे शून्य सावलीचा अनुभव चांगला अनुभवता येतो असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.