ठाणे Thane Child Marriage :ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 29 वर्षीय तरुणानं 12 वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिलीय.
दोघंही मुळचे सातारा जिल्ह्यातील : देशात बालविवाह करणं बेकायदेशीर असताना, या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी बालविवाह झाल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिलीय. या नराधमानं अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिला गर्भधारणा केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आलाय. यातील आरोपी पुरुष आणि अल्पवयीन मुलगी दोघंही मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील असल्याचं त्यांनी सांगितलं.