ठाणे -येथील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याचे वैभव, वैशिष्ट्य, इतिहास असलेल्या घोडबंदर किल्ल्यावर दिपावली पाडव्याच्या दिवशी दीपोत्सव व श्रमदान मोहीम यशस्वी पार पडली.
ठाण्यात किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी हेही वाचा -अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी
ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व जपण्यासाठी गड संवर्धन व दिवाळी पाडव्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला.सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे आणि हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पाडवा कार्यक्रम निमित्त खास आगळी वेगळी मोहीम ३५ जणांच्या उपस्थित पार पडली.
'करूनी युवा पिढीचे संघटन, उभारु चळवळ गडकोट संवर्धन” असा नारा देत 'माझा गड, माझा अभिमान' जयघोषात या मोहिमेस सुरुवात झाली. इतिहासाचे जतन आणि ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याकरिता ह्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. किल्ल्याच्या आवारातील गवत , बुरुजाकडे जाणारी पायवाट, बुरूजावरील गवत व बुरुजाकडेला उगवलेली झुडपे काढुन टाकण्याचे काम केले. सायंकाळी ६ च्या सुमारास शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रांगोळी काढून फुलांनी बुरूज व पायऱ्या सजवून सर्वत्र पणती लावुन पूजा करण्यात आली. इतिहास व गडकिल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे, असा संदेश देत ही मोहीम दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात पार पडली.
किल्ल्यावर अनेक लोकं सुट्टीसाठी, फोटो काढण्यासाठी तर रात्रीच्या वेळी मद्यपान करण्यासाठी येतात. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य नाहीसे झाले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे अस्तित्व व पावित्र्य जपण्यासाठी ठाण्यातील सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन, ठाणे व हिंदवी स्वराज्य मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने गड संवर्धन मोहीम राबविण्यात आली.