ठाणे- गुंतवणूकदारांना नोंदणी करून देण्यात आलेल्या सदनिका आणि व्यावसायिक गाळे बनावट कागदपत्रे बनवून अनेकांना विकल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी संजय भालेराव आणि प्रतिमा भालेराव यांच्या विरुद्ध राबोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे गुंतवणूकदारांनी तब्बल २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक केले होती.
बाधंकाम व्यावसायिकाने गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्याचे अमिष दाखविले होते. याप्रकरणी तक्रारदार विजय नरोत्तमदास अग्रवाल (वय ७१ रा. पश्चिम अपार्टमेंट, दादर) यांनी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एस. डी. भालेराव कन्स्ट्रशन प्रा. लि, एस. डी. भालेराव असोसिएट आणि मेसर्स क्राऊन बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना मोठ्या परतीच्या रक्कमेचे अमिष दाखवून २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची गुंतवणूक करवून घेतली होती.