ठाणे- ठाण्यातील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे आणि वाद काही नवा विषय नाही. आता त्यामध्ये नव्या घटनेची भर पडली आहे. बारमध्ये झिंग झिंग झिंगाट गाण्यावर नाचतानाचा त्यांचा व्हिडिओ बाहेर आला आहे. स्वत:ला सुसंस्कृत पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजप पक्षाचे नेते जर सार्वजनिक जीवनात असे वागत असतील तर हे धक्कादायक आहे. विलास कांबळे यांनी याआधी ठाणे महानगर पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषविले आहे.
नगरसेवक विलास कांबळे अनेकदा वादात सापडले आहेत. २०१७ साली पालिका निवडणुकीच्या आधी प्रभागातील अनेक नागरिकांना सहलीला घेऊन जाऊन त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला. बस मालकांचे लाखो रुपयांचे बिल दिले नाही याबाबत बस मालकाने पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच बारमध्ये तोडफोड केल्याचेही प्रकरण जुने नाही. आता तर चक्क झिंग झिंग झिंगाट गाण्यावर दारू पिऊन नाचताना ते दिसत आहेत. आपण नगरसेवक आहोत हे विसरून ते बारमध्ये गाचगाणे करत आहेत.