महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडी तालुक्यातील पिसा धरणही भरले १०० टक्के - mumbai

आठवड्याभरापासून भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील पावसाचा जोर कायम असल्यामुळे पिसा धरण १०० टक्के भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने मुंबई, ठाणे शहराप्रमाणेच शहापूर, भिवंडी तालुक्यातील बळीराजाही सुखावला आहे.

भिवंडी तालुक्यातील पिसा धरणही भरले 100 टक्के

By

Published : Jul 26, 2019, 9:17 PM IST

ठाणे -राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई, ठाण्यासह भिवंडीला पाणीपुरवठा करणारे पिसा धरणही आता शंभर टक्के भरले आहे.

मुंबई, ठाणे शहराप्रमाणेच शहापूर, भिवंडी तालुक्याला धरणाचा लाभ

मुंबई आणि ठाणे महापालिकेचे उदंचन केंद्र असलेल्या भिवंडी तालुक्यातील पिसा धरण १०० टक्के भरले आहे. शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या जलाशयातून विमोचकाद्वारे नदीत सोडलेले पाणी पिसे बंधाऱ्यात साचले जाते. या बंधाऱ्यातील पाणी उदंचन पद्धतीने मूड जलवाहिनी सोडण्यात येते. गेल्या आठवड्याभरापासून भिवंडी आणि शहापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. पिसा धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले आहे.

एक महिना अगोदरच धरण ओव्हरफ्लो

पिसा धरणातून मुंबई ठाण्यासह भिवंडीच्या काही भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. हे धरण भिवंडी तालुक्यातील 'आमने पिसे' ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भरणारे धरण यंदा मात्र एक महिना अगोदरच ओव्हरफ्लो झाले आहे. समाधानकारक पावसामुळे शहरांप्रमाणेच तालुक्यातील बळीराजा देखील सुखावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details