महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात बँक कर्मचाऱ्यांनीच मारला खातेदारांच्या रक्कमेवर डल्ला - ठाणे पोलीस

सर्व खातेदारांच्या खात्यातील तब्बल ११ लाख ६० हजारांची रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर ट्रान्सफर करत खातेदारांची फसवणूक केली आहे. बँकेतील जे खाते मोबाईल नंबरसोबत लिंक नव्हते, त्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने हे पैसे दुसऱ्या खात्यात वळते केले आहे.

आरोपी अटक
आरोपी अटक

By

Published : Mar 31, 2021, 10:41 PM IST

ठाणे - बँकेत तुमची रक्कम सुरक्षित असते असं नेहमीच म्हटलं जाते. मात्र, अंबरनाथ मधील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने खातेदारांच्याच रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे मोबाईल नंबर लिंक नसलेल्या खातेदाराच्या रक्कमेवर डल्ला मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बँक कर्मचारी सुमित मंगलानीसह खातेदार विजय गुप्ताला पोलिसांनी अटक केली आहे.

बँकेतील बारा खातेदारांच्या रकमेवर डल्ला
अंबरनाथ पश्चिमेला बँक ऑफ बडोदा आहे. या बँकेत क्लार्क म्हणून आरोपी सुमित मंगलानी काम करतो. या आरोपीने आपल्या बँकेतील बारा खातेदारांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. या सर्व खातेदारांच्या खात्यातील तब्बल ११ लाख ६० हजारांची रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर वळती करत खातेदारांची फसवणूक केली आहे. बँकेतील जे खाते मोबाईल नंबरसोबत लिंक नव्हते, त्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली आहे. खातेदार आणि बँकेच्या लक्षात ही बाब आल्यावर बँकेच्या मॅनेजरने अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार केली.

ठाणे बॅंक फसवणूक कारवाई

गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग?
विशेष म्हणजे अपहार करणारा बँकेतील सुमित मंगलाणी याला एक हात नसून तो अपंग आहे. दोघांनी आपसात संगनमत करून अपहार केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिवाय या दोन्ही आरोपींना २ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रियेत आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलिस करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details