ठाणे - पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ७ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर २ बालके गंभीर जखमी आहेत. हा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावात घडला. अर्णव प्रमोद पाटील (७) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव असून पियुष मनोज पाटील (८) आणि निहान पप्पू म्हात्रे (९) जखमी झालेल्या बलकांची नावे आहेत.
भटक्या कुत्राच्या हल्ल्यात ७ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू तर २ मुले जखमी - bhivandi
२६ जूनला पियुष आणि अर्णव हे दोघे घराबाहेर खेळत असताना अचानक पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोघांवर हल्ला केला. मात्र, उपचार सुरू असतानाच अर्णवचे काल बुधवारी सायंकाळी निधन झाले.
२६ जूनला पियुष आणि अर्णव हे दोघे घराबाहेर खेळत असताना अचानक पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दोघांवर हल्ला केला; हल्ल्यात अर्णवच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. याआगोदर त्याच कुत्र्याने २५ जूनला निहानवर हल्ला करून चावा घेतला होता. सुरुवातीला तिघांवर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, अर्णवची प्रकृती खालवल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अर्णवचे काल बुधवारी सायंकाळी निधन झाले. घटनेने हायवे दिवे गावात शोककळा पसरली असून सतर्कता म्हणून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी असलेल्या पियुष आणि निहान या दोघांना गुरुवारी जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.