ठाणे - डोंबिवलीतील एका हाय प्रोफाईल सोसायटीतील टोलेजंग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये (आयपीएल) सुरू असलेल्या सामन्याच्या वेळी बेटींग घेणाऱ्या तीन बुकींचा पोलिसांनी शिताफीने छापा टाकून अटक केली आहे. अटक आरोपीकडून ७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. रितेश कुवरप्रकाश श्रीवास्तव (वय ४४), कुणाल बबनराव दापोडकर, (वय ३३) निखील फुलचंद चौरसिया (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या बुकींची नावे आहेत.
खबऱ्यामुळे फुटलं बुकींचे बिंग
सध्या इंडियन प्रीमियर क्रिकेट ( आयपीएल) लीगचे सामने सुरू आहेत. त्यातच डोंबिवलीतील हायप्रोफाईल असलेल्या लोढा - पलावा, कासारिओ गोल्ड, एफ विंग, २ माळयांवर, प्लॅट क. २०१ येथे काही जण क्रिकेटवर सट्टा खेळत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने छापा टाकला असता आरोपी इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावर अवैधरित्या बेटिंग (सट्टा) घेत असल्याचे आढळून आले.
राजस्थान रॉयल्स विरूध्द सनरायझर्स हैदराबाद सामन्यावर सट्टा
पोलिसांच्या छापेमारी वेळी आरोपी निखील हा मोबाईल व लॅपटॉप वरून अबुधाबी येथे सुरू असलेल्या राजस्थान रॉयल्स विरूध्द सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा (जुगार/बेटींग) घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या तिन्ही बुकींना ताब्यात घेऊन घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले मोबाईल व सिमकार्ड नसलेले एकूण वेगवेगळया कंपनीचे १७ मोबाईल जप्त केले. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम ४,५, १२(अ) सह भादवि. ४२०, ४६८, ३४, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपआयुक्त सचिन बाबासाहेब गुंजाळ यांनी दिली.
आयपीएलवर सट्टा: हायप्रोफाईल सोसायटीतून 3 क्रिकेट बुकींना अटक; 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत - ठाणे आयपीएल सट्टा न्यूज
डोंबिवलीतील एका हाय प्रोफाईल सोसायटीतील टोलेजंग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये (आयपीएल) सुरू असलेल्या सामन्याच्या वेळी बेटींग घेणाऱ्या तीन बुकींचा पोलिसांनी शिताफीने छापा टाकून अटक केली आहे. अटक आरोपीकडून ७ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हायप्रोफाईल सोसायटीतून 3 क्रिकेट बुकींना अटक; 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत