ठाणे - राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. आज भिवंडीत समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच व्हॉट्सअपवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भिवंडीत सलग दुसऱ्यांदा १० वीचा पेपर फुटला; प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल - paper
भिवंडीत समाजशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच व्हॉट्सअपवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र
खळबळजनक बाब म्हणजे या आधी १५ मार्चला विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती. त्यावेळीही माध्यमिक परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या तक्रारीनंतर परीक्षा मंडळाने कोणतीच कारवाई न केल्याने हा पेपरफुटीचा प्रकार भिवंडी शहरात घडला आहे. यामुळे मंडळाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.