ठाणे -आंबिवली ते शहाड दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा ते सीएसटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुमारे वीस मिनिटे ठप्प झाली होती. ही घटना सकाळी 7:00 सुमारास घडली. मात्र, काही वेळातच दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेमुळे कसाराहून मुंबईकडे आणि मुंबईवरून कसाऱ्याककडे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. दहा ते पंधरा मिनिटे उशिराने गाड्या धावत आहेत.
डंपरच्या धडकेत ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू - मध्य रेल्वे वाहतूक बातमी
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबिवली रेल्वे स्थानकानजिक असलेल्या रेल्वे फाटकला रेतीने भरलेल्या डंपरने धडक दिली. त्यामुळे ओवरहेड वायरमधील वीज पुरवठा खंडित होऊन रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा-अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले
टिटवाळावरुन 07:21 ची लोकल 7 वाजून 35 मिनिटाने सुटली होती. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे वाहतूक खोळंबल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबिवली रेल्वे स्थानकानजिक असलेल्या रेल्वे फाटकला रेतीने भरलेल्या डंपरने धडक दिली. त्यामुळे ओवरहेड वायर मधील वीज पुरवठा खंडित होऊन रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, पंचवीस ते तीस मिनिटात रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच रेल्वे फाटकाला धडक देणारा डंपर चालक पसार झाला असून रेल्वे गेट मॅनने डंपरचा नंबर लोहमार्ग पोलिसांना दिला आहे. आता पोलीस त्याचा शोध घेत आहे.