महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खारघरमधल्या प्रसिद्ध कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून तरुणीवर बलात्कार - panvel crime

गुरूच्या प्रतिमेला काळिमा फासणारी सामुहीक बलात्काराची घटना पनवेलमधल्या प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये घडली. खारघर सेक्टर १२ मधील महेश ट्युटोरियल क्लासमध्ये एका शिक्षकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

दिनेश जैन, अनुप शुक्ला

By

Published : Oct 18, 2019, 5:23 PM IST

ठाणे - गुरूच्या प्रतिमेला काळिमा फासणारी सामूहिक बलात्काराची घटना पनवेलमधल्या प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये घडली. खारघर सेक्टर १२ मधील महेश ट्युटोरियल क्लासमध्ये एका शिक्षकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे घटनेच्या आठ दिवसांपूर्वी आणखी दुसऱ्या शिक्षकाने तरुणीवर अतिप्रसंग केला होता.

खारघरमधल्या प्रसिद्ध कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून तरुणीवर बलात्कार

हेही वाचा - औरंगाबादेत पुन्हा पीडितेवर बलात्कार, जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचे कृत्य

दीपेश जैन असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. सुप्रसिद्ध अशा 'महेश ट्यूटोरिअल कोचिंग क्लासेस'ची एक शाखा खारघर सेक्टर १२ मध्ये सुरू आहे. दीपेश जैन हा या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होता. या शाखेत पीडिता पार्टटाईम नोकरी करत होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासोबत सोबत या शाखेत पार्टटाईम जॉब करून घरखर्चाला हातभार लावत होती.

गेल्या आठवड्यात संध्याकाळी साडेसात वाजता ती क्लासमधून निघाली. पण छत्री विसरल्यामुळे परत क्लासमध्ये आली असता शिक्षक दिनेश जैन याने दरवाजा बंद करून दमदाटी करत तरूणीवर अत्याचार केला. बदनामीमुळे तरूणीने लगेच घरच्यांना हा प्रकार सांगितला नाही. मात्र, यानंतर या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच याच शाखेतल्या दुसऱ्या शिक्षकाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अनुप शुक्ला असे या दुसऱ्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

आपल्यावर दोन वेळा झालेला अतिप्रसंग सहन करून अखेर पीडितेने खारघर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्याची हिंमत केली. खारघर पोलीस ठाण्यात आरोपी दिनेश जैन आणि अनुप शुक्ला यांच्यावर कलम ३७६, ३४२ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी नवी मुंबईतल्याच एका नामांकित शाळेत शिक्षकाने बलात्कार करून विद्यार्थिनीला गर्भवती केल्याची घटना अजून विसरले नव्हते, त्यातच आता खारघरमधील या घटनेने पनवेलसह नवी मुंबई शहर हादरून गेले आहे. खारघर पोलीस या दोन्ही आरोपी शिक्षकाचा तपास करत असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा - लॉजवर आढळला तरूणीचा मृतदेह, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

ABOUT THE AUTHOR

...view details