महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 6, 2022, 8:37 PM IST

Updated : Jan 6, 2022, 8:55 PM IST

ETV Bharat / state

Corona Infestation : उलटी केल्यामुळे लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी - डॉ. उदय कुलकर्णी

लहान मुलांना आपण मोठ्यांप्रमाणे कोरोनाची औषधे देऊ शकत नाहीत. मग लहान मुलांना फक्त उलटी करण्यास लावावी. कोरोनामधून बाहेर पडण्यासाठी उलटी करणे हा मोठा उपाय आहे, असा महत्वाचा सल्ला टास्क फोर्स सदस्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिला आहे.

लहान मुलांना कोरोना
लहान मुलांना कोरोना

ठाणे -पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा परिणाम लहान मुलांवर होताना फारसा दिसला नाही. परंतु सध्याच्या तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची बाधा होताना दिसत आहे. त्यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांना आपण मोठ्यांप्रमाणे कोरोनाची औषधे देऊ शकत नाहीत. मग लहान मुलांना फक्त उलटी करण्यास लावावी. कोरोनामधून बाहेर पडण्यासाठी उलटी करणे हा मोठा उपाय आहे, असा महत्वाचा सल्ला टास्क फोर्स सदस्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिला आहे.

डॉ. उदय कुलकर्णी आणि पालकांच्या प्रतिक्रिया


'कोरोनावर घरी करावे 'हे' उपाय'

या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होत असल्याच्या अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत. पालक याबाबत चिंता व्यक्त करतांना दिसत आहेत. १२ वर्षांखालील मुलांना कोरोनाची बाधा झाली. तर त्यांना मोठ्यांप्रमाणे कोरोनाची औषध देऊ शकत नाहीत. त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे त्यांना दूध पाजून उलटी करण्यास लावणे. दोन ते तीनदा उलटी केल्यावर त्यांच्या छातीतील कफ हा त्या उलटीद्वारे बाहेर पडेल. यामुळे मुलांना कोरोनातून बाहेर पडण्यास त्यांना मदत होईल. हा घरच्या घरी उपाय करावा, म्हणजे मोठ्या प्रमाणात लहान मुलांना त्याची मदत मिळेल, असा महत्वाचा सल्ला टास्क फोर्सचे सदस्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिला आहे.

'लस घेण्याआधी घ्यावी काळजी'

आता १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी या वयोगटातील मुलांनी लस घेण्याच्या तीन दिवस आधी व लस घेतल्यावर तीन दिवसानंतर हळद व तूप खावे. त्यामुळे तुम्हाला या लसीचा कसलाही त्रास होणार नाही, असा ही सल्ला डॉ. उदय कुलकर्णी यांनी दिला आहे.

हेही वाचा -Maharashtra Lockdown : राज्यात विकेंड लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार - राजेश टोपे

Last Updated : Jan 6, 2022, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details