महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tanker Drags Man : जाब विचारल्याच्या रागातून ६० वर्षीय व्यक्तीला टँक चालकाने फरफटत नेऊन चिरडले, आरोपीचा शोध सुरुच - टँकर कार पनवेल अपघात

Tanker drags 60 yr old man नवी मुंबईत सेवानिवृत्त अधिकाऱ्याने जाब विचारल्यानं टँकर चालकान धडक दिली. यावेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा चिरडून मृत्यू झाला.

Tanker Drags Man
Tanker Drags Man

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 11:08 PM IST

नवी मुंबई:नवी मुंबईतील पनवेल परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पनवेल परिसरातील शहरातील तारा गावाच्या हद्दीत एका टँकरने एका ६० वर्षीय पुरुषाला चिरडले आहे. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. श्रीकांत मोरे (६०) असे अपघात मृत्युमुखी पडलेल्या पुरुषाचे नाव आहे.



जाब विचारला म्हणून टॅंकर चालकाला आला राग:संबंधित घटना नवी मुंबई परिसरातील पनवेल येथील तारा गावच्या हद्दीत घडली आहे. सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्रीकांत मोरे हे त्यांच्या खासगी कारने पत्नीसह शनिवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरून पनवेलहून अलिबागच्या दिशेने निघाले होते. याप्रवासादरम्यान तारा गावाजवळील उड्डाण पुलाजवळ एका टॅंकरने मोरे यांच्या कारला पाठीमागून धडक मारली. यामुळे त्यांच्या कारचे नुकसान झाले. याप्रकरणी श्रीकांत मोरे हे त्यांच्या कारमधून उतरले व संबंधित टँकर चालकास जाब विचारला. त्यामुळे टॅंकर चालकाला मोरे यांचा प्रचंड राग आला. त्याने श्रीकांत मोरे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना फरफटत नेऊन चिरडले.


मोरे जखमी झाल्याचे पाहताच टॅन्कर चालकाने काढला पळ:श्रीकांत मोरे जखमी झाल्याचे पाहतात टॅन्कर चालकाने संधी साधत घटनास्थळावरून पळ काढला. पतीला चिरडल्याचे पाहून मोरे यांच्या पत्नीने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी घटनास्थळी जमाव जमला. पोलीस व नागरिक यांच्या मदतीने श्रीकांत मोरे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मोरे यांना मृत घोषित केले. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, पनवेल तालुका पोलिसांनी शनिवारी टँकर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीची ओळख पटली असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी एपीआय सचिन पोवार अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details