महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्मशानभूमीबाहेरच दोन भावांवर तलवारीने जीवघेणा हल्ला; १ अटकेत ७ हल्लेखोर फरार - उल्हासनगर दोन भावांवर चॉपरने हल्ला

अंत्यविधीकरून स्मशानभूमीबाहेर जात असतानाच ८ जणांच्या हल्लेखोर टोळक्याने दोन सख्ख्या भावांवर तलवार आणि चॉपरने जीवघेणा हल्ला (Attack on two brothers) केला. ही घटना उल्हासनगर कॅम्प ५ नंबरमधील स्मशानभूमी बाहेरच घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात ८ हल्लेखोर विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ulhasnagar crime
हल्ला झालेले ठिकाण

By

Published : Feb 22, 2022, 10:31 PM IST

ठाणे - अंत्यविधीकरून स्मशानभूमीबाहेर जात असतानाच ८ जणांच्या हल्लेखोर टोळक्याने दोन सख्ख्या भावांवर तलवार आणि चॉपरने जीवघेणा हल्ला (Attack on two brothers) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प ५ (Ulhasnagar Camp 5) नंबरमधील स्मशानभूमी बाहेरच घडली आहे.

माहिती देताना पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते
  • हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा -

याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात ८ हल्लेखोर विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली आहे. प्रसाद पाटील आणि श्रीबाबू पाटील असे गंभीर जखमी झालेल्या दोन भावांचे नावे आहेत. तर रवीजय सिंघानी असे अटक हल्लेखोराचे नाव असून मुख्य आरोपी विजय पाटीलसह ७ आरोपी फरार झाले आहेत.

  • मुख्य आरोपी व जखमी चुलत भाऊ -

जखमी पाटील बंधू आणि मुख्य हल्लेखोर विजय पाटील हे चुलत भाऊ आहेत. त्यातच त्यांचे नातेवाईक असलेले उल्हासनगरचे शिवसेनेचे नगरसेवक आकाश पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी जखमी पाटील बंधू आज दुपारच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प ५ नंबर मधील स्मशानभूमीत गेले होते. अंत्यविधी उरकून घरी परतत असतानाच स्मशानभूमी बाहेरच दबा धरून बसलेल्या मुख्य आरोपी विजय पाटीलसह ८ जणांच्या टोळक्याने अचानक पाटील बंधूवर तलवार, चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • पोलिसात तक्रारी दिल्याच्या वादातून हल्ला

जखमी प्रसाद व श्रीबाबू हे दोघे भाऊ मुख्य आरोपी विजय याच्या विरोधात पोलिसात तक्रारी देत असल्याच्या रागातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हल्लेखोर एका रिक्षातून आल्याने ती रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली. तर पोलिसांनी काही तासातच एक सराईत गुन्हेगार असलेला हल्लेखोर रवीजय याला अटक केली. तसेच मुख्य आरोपी विजय पाटीलसह इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके रवाना केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details