महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जवाबदारी घेतो...' ठाण्यातील रस्त्यांवर संदेश - स्वामी फाउंडेशन

पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना समजावूनदेखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ठाण्यातील स्वामी फाउंडेशन ठाणे पोलिसांच्या मदतीला आली आहे. त्यांनी शहरातील रस्त्यांवर संदेश लिहले आहेत.

Thane Corona Update
ठाणे कोरोना

By

Published : Apr 12, 2020, 11:29 AM IST

ठाणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ठाण्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना समजावून देखील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ठाण्यातील स्वामी फाउंडेशन ठाणे पोलिसांच्या मदतीला आली आहे.

तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जवाबदारी घेतो

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी ठाण्यातील स्वामी फाउंडेशनने शहरातील मध्यवर्ती भाग असणाऱ्या पाचपाखाडी येथे रस्त्यावर संदेश लिहले आहेत. नागरिकांसाठी घरातच रहावे यासाठी एक बोध वाक्य लिहिले असून त्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली जात आहे. 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, पूर्ण वेळ राहू घरात, कोरोनावर करू मात' अशा प्रकारचा संदेश रस्त्यावर लिहण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details