ठाणेSuspicious of wifes character: : ठाणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र, एका व्यक्तीने चक्क पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून एक धक्कादायक कृत्य केले. त्यामुळे त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल झालाय.
३५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं स्वतःसह मुलीची डीएनए चाचणी तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरात समोर आला आहे. शिवाय पीडित विवाहितेने माहेरहून पैसे आणावेत यासाठी सासरच्यांकडून छळवणूक केली जात होती. अखेर याप्रकरणी पीडित पत्नीनं पतीसह सासरच्या ७ जणांविरोधात विविध कलमान्वये शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सात जणांविरोधात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल झालाय.
दुसरे लग्न केल्याचा आरोप-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिलेचा निकाह भिवंडीतील आमपाडा भागात राहणाऱ्या आरोपी सलमान ( बदलले नाव) याच्याशी झाला आहे. मात्र निकाहच्या काही महिन्यानंतरच सासरच्या मंडळीने आपसात संगनमत करून पीडित विवाहितेकडे ९ सप्टेंबर २०१७ ते १२ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत लग्नानंतर पैश्यांच्या स्वरूपात हुंडा आणण्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ करत तगादा लावून धरला होता. मात्र त्यास पीडित विवाहिता नकार देत होती. खळबळजनक बाब म्हणजे पतीनं पीडित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन स्वतःसह मुलीची डीएनए चाचणी केल्याचे पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवाय पीडित ही आरोपी पतीची पहिली पत्नी असतानाही त्याने दुसरे लग्न केल्याचा आरोपही पीडित विवाहितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
आरोपींना अद्याप अटक नाही-दरम्यान, पतीसह सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने ३ सप्टेंबर रोजी शांतीनगर पोलीस ठाणे गाठत पतीसह ७ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळीवर भादंवि कलम ४९८ (अ),४९४, ३२३, ५०४, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधिकारी एम.एम. फर्डे करीत असून याप्रकरणी आतापर्यत कोणालाही अटक केली नसल्याचं सांगण्यात आले.
हेही वाचा-
- Cyber Crime in Maharashtra : वरिष्ठ पोलीस अधिकारीही हॅकर्सच्या टार्गेटवर, अधिकाऱ्यांचे फोटो लावून अनेकांना घालतायेत गंडा
- Morshi Murder Case : मोर्शी खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, सलाईनमधून दिलं आई आणि लहान भावाला 'प्रतिबंधित औषध', कारण...